जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खांजापूर ता. संगमनेर जि अहमदनगर ही शाळा संगमनेर पासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर आहे .आग्नेश्वर मंदिराच्या पावन भूमीत अत्यंत रम्य व निसर्गाच्या सान्निध्यात असून जवळच डोंगररांगा आहे . या डोंगर रांगामध्ये विठ्ठलकडा हा प्रसिद्ध धबधबा आहे . पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे हा धबधबा पाहण्यास येतात. प्रभू रामचंद्र जेंव्हा चौदा वर्ष वनवासात होते तेंव्हा काही दिवस अग्नेश्वर परिसरात प्रभू रामचंद्र यांचे वास्तव या ठिकाणी होते अशा पावन भूमीत खांजापूर गाव वसलेले
       सन १९६० ला सुरु झालेली शाळा आहे. सुरुवातीस लोकसहभागातूनच शिक्षकांचा पगार दिला जाई त्यानंतर श्री. दये गुरुजी यांनी शाळेला अत्यंत शिस्तप्रिय केले आज या शाळेतील अनेक विद्यार्थी देशपातळीवर आपल्या गावाचे व शाळेचे नाव उंचावत आहे .गेली तीन वर्ष झाली शाळेला इमारत नाही पण ग्रामस्त व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने शाळा व्यायाम शाळा इमारत , सार्वजनिक वाचानालयात, व ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी भरते आहे .
      गावचे वैशिष्टे म्हणजे या गावातून एकही विद्यार्थी बाहेर गावात शाळेत जात नाही. शाळेत आज १२७ मुले आनंदाने शिकत आहे. पालकांच्या सहकार्याने संगणक कक्ष ,अद्यावत विज्ञान प्रयोगशाळा, प्रोजेक्टर, स्मार्ट टी व्ही द्वारे दैनदिन अध्यापन केले जाते.
      इयत्ता चौथी पर्यंत असलेली शाळा ही सन २०२०-२१ मध्ये सातवी  इयत्ता पर्यंत जाणार आहे. द्विशिक्षकी शाळा आज बहु शिक्षकी झाली आहे.आज ५ शिक्षक येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. आज शाळेच्या २ वर्गखोली ची एक इमारत तयार झाली आहे.लवकरच लोकसहभागातून ३ वर्ग खोली बांधण्यात येवून एक आकर्षक व आनंदाई वातावरणात ही शाळा आपली ओळख बनवेल यात शंका नाही.